Saturday, May 17, 2008

'नसताना'ही का असते ती?...

इतकी सुंदर का दिसते ती?
मनात माझ्या का ठसते ती?...

विचारता मी, टाळे उत्तर--
आणि खळाळुन का हसते ती?...

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...

मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसते ती?...

भेटत नाही कधी तिला मी
तरी खुशाली का पुसते ती?...

कसे वागणे 'अजब' तिचे हे?
'नसताना'ही का असते ती?... CTRL+C,CTRL-v

touch kar gaya...

मिटले न डोळे आता, हरवून सांज गेली...
कोवळ्या मनास लाडे, स्पर्शून सांज गेली...

हरवलो आज पुन्हा मी, पलटून काळाची पाने...
हसवून फ़सवे मला ती, चिडवून सांज गेली...

एकांती खोलित माझ्या, पकडले का मी कवडसे...
जाळून उन्हात मजला, सावलित सांज गेली...

पडलेत फिकेहि आता, रंग तुझ्या स्मरणाचे...
बेरंग करून मजला, रंगून सांज गेली...

उजाडेल सुर्य उद्याहि, हे खेळ असे क्षणाचे...
पुसून कोरी पाटी, शिकवून सांज गेली... Ctrl+C,CTRL-V